शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

शासकीय वाहनावरून ‘कही खुशी-कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 2:11 AM

वाशिम : शासकीय वाहनावरून सभापतींमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण गुरुवारी जिल्हा परिषद प्रांगणात उपस्थितांना अनुभवयास मिळाले. सहा पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप करण्यात आल्याने या सभापतींमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्याने या सभापतींच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देपंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप जि.प. सभापतींची वाहने अधिवेशनात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासकीय वाहनावरून सभापतींमध्ये ‘कही खुशी-कही गम’चे वातावरण गुरुवारी जिल्हा परिषद प्रांगणात उपस्थितांना अनुभवयास मिळाले. सहा पंचायत समितीच्या सभापतींना नवीन वाहनांचे वाटप करण्यात आल्याने या सभापतींमध्ये आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्याने या सभापतींच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले.रिसोड, वाशिम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा व मालेगाव अशा सहा पंचायत समितीच्या सभापतींसाठी नवीन शासकीय वाहने खरेदी करण्याचा ठराव यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित झाला होता. त्यानुषंगाने प्रशासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर सहा शासकीय वाहने खरेदी करण्यात आली. सदर वाहने पंचायत समिती सभापतींच्या ताब्यात देण्यासाठी २१ डिसेंबर रोजी सर्व सभापतींना आमंत्रित केले होते. २१ डिसेंबर रोजी सहाही सभापतींना अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाहनांची चावी देण्यात आली. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींची शासकीय वाहने जमा करून विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. हा प्रकार राज्यातून केवळ वाशिम जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांसोबत घडला असून, नेमक्या वाशिम जिल्हा परिषदेच्याच चारही सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता का उपलब्ध करून देण्यात आली, याचा जाब या सभापतींनी जिल्हा परिषद प्रशासनाला विचारला. शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने सध्या ग्रामीण भागात दौरे करणे प्रभावित झाल्याची बाब पदाधिकार्‍यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. वाहने भाड्याने घेऊन दौरे करावे लागत आहेत. अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेच्या सभापतींची वाहने अधिवेशनाकरिता उपलब्ध करून दिली नसल्याने नेमकी वाशिम जिल्हा परिषदेच्याच सभापतींची वाहने जमा करून हा एकप्रकारे महिला सभापतींचा अपमान आहे, अशी भावनाही सभापती पानुताई दिलीप जाधव, यमुना सीताराम जाधव, सुधीर  गोळे व विश्‍वनाथ सानप यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली. सध्या शासकीय वाहने नसल्याने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी तसेच कोणत्या आधारावर शासकीय वाहने अधिवेशनाकरिता पाठविण्यात आली, याची माहिती देण्यात यावी, अन्यथा न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या चारही विषय समितीच्या सभापतींनी दिला.  दरम्यान, एकाच दिवशी शासकीय वाहनासंदर्भात ‘कही खुशी-कही गम’ची परिस्थिती निर्माण होण्याची अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी घटना आहे, अशी चर्चा आहे.शासकीय वाहनाचे सदर प्रकरण नेमके कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिम