शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

वाशिम जिल्ह्यातील शासकीय कार्यालये बंदच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 2:43 PM

Washim News : वाशिम जिल्ह्यातील शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २० मे पर्यंत शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शुक्रवारी जारी केला. अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित कार्यालये मात्र सुरू राहणार आहेत.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये व आस्थापना बंद २० मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेशी संबंधित महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य सेवा, नगरपालिका आदी. तसेच अत्यावश्यक सेवे अंतर्गत महावितरण, कोषागार, पाणी पुरवठा, स्वच्छता, दूरसंचार, उपप्रादेशिक परिवहन इत्यादी शासकीय कार्यालये सुरु राहणार आहेत. इतर कार्यालयांना आपले कामकाज आॅनलाईन सुरु ठेवण्याची मुभा देण्या आली. शासकीय यंत्रणांना मान्सूनपूर्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयीची कामे करता येतील. त्यासाठी त्यांना वेगळ्या परवानगीची गरज नाही. सर्व शासकीय कार्यालये अभ्यागतांसाठी पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहेत. अतिआवश्यक कामांसाठी ८३७९९२९४१५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय