‘कोरोना’ विषाणूबाबत शासकीय कार्यालयात खबरदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 18:10 IST2020-03-21T18:09:53+5:302020-03-21T18:10:11+5:30
सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ केल्यानंतर कराचा भरणा केल्या जात आहे.

‘कोरोना’ विषाणूबाबत शासकीय कार्यालयात खबरदारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संपुर्ण देशात कोरोनामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही या संसर्गजन्य आजाराने प्रवेश केल्याने शासन व जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना कार्यान्वीत केल्या आहेत. वाशिम नगरपरिषदेमध्ये कराचा भरणा करण्याकरिता येणाºयांना सॅनिटायझर देऊन हात स्वच्छ केल्यानंतर कराचा भरणा केल्या जात आहे. विशेष म्हणजे या कार्यालयासह ईतरही शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनो विषाणुबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.
३१ मार्च पूर्वी १०० टक्के करवसुली व्हावी याकरिता वाशिम नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी सुटीच्या दिवशीही कामकाज सुरु ठेवले आहे. आज शनिवार, २१ मार्च रोजी सुटी असताना कर विभागातील कर्मचारी कर्तव्यावर होते. सर्वांनी मास्क, रुमाल बांधून आपले कर्तव्य पार पाडले. यावेळी कराचा भरणा करण्यासाठी येणाºयांचीही काळजी कर विभागाच्याावतिने घेण्यात आली. मुख्याधिकारी दीपक मोरे, करनिरिक्षक अ.अजीज अ.सत्तार यांच्या मार्गदर्शनात करवसुली विभागातील साहेबराव उगले, संतोष किरळकर, किशोर हडपकर, संजय काष्टे, एन.के. मुल्ला, मिळकत विभागाचे नरेंद्र साकरकर उपस्थित होते.