शासकीय कर्मचाऱ्याने घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 04:37 PM2020-11-18T16:37:03+5:302020-11-18T16:37:38+5:30

Risod News रिसोड पंचायत समितीमधील वरीष्ठ लिपीकाने कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला.

Government employees took advantage of the debt waiver scheme | शासकीय कर्मचाऱ्याने घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ

शासकीय कर्मचाऱ्याने घेतला कर्जमाफी योजनेचा लाभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शासनाचे नियम धाब्यावर बसवुन रिसोड पंचायत समितीमधील वरीष्ठ लिपीकाने कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला. याची चाकोली येथिल गजानन परशराम गरकळ यांनी संबंधिताकडे तक्रार करुन शासनाच्या कर्जमाफीचा चुकीच्या पध्दतीने लाभ घेणा-या  कर्मचा-यावर कारवाईची मागणी केली हाेती. यावर चाैकशीअंती सदर कर्मचाऱ्याने या याेजनेचा लाभ घेतल्याचे सिध्द झाले असून त्याजवळून कजार्च्या रकमेची व्याजासह वसुली करण्यात येणार आहे.
 तालुक्यातील चाकोली येथिल सेवासहकारी संस्थेचे सभासद आणि रिसोड पंचायत समिती मधील कार्यरत वरीष्ठ  लिपीक रंगराव लहाणुजी गरकळ यांनी सन.२०१२-१३ मध्ये सेवा सहकारी संस्था चाकोली कडुन सुमारे ४४९०० रूपयांचे पिक कर्ज घेतले होते.त्या रक्कमेचे व्याज २३०९० रूपये झाले.अशा प्रकारे एकुण ६७९९० रूपये झाले.त्यानंतर सन २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना जाहीर झाली.यामध्ये शासकीय  कर्मचा-यांना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ट  आसतांना तरी सुध्दा रिसोड पंचायत समिती मधील कार्यरत आसलेले वरीष्ठ  लिपीक रंगराव लाहनुजी गरकळ यांनी स्वतः कर्जमाफीचा लाभ मिळन्यासाठी अर्ज करित अंगठा लावुन कर्ज माफीचा लाभ घेतला.गजानन गरकळ यांच्या तक्रारीवरुन संबिधतांनी चाैकशी केली असता सिध्द झाल्याने त्यांच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी संबधितांनी सूचना केल्या आहेत.


सदर कर्मचारी यांनी सन २०१७-१८ मध्ये शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतल्याचे चौकशी दरम्यान सिध्द झाले आहे.प्रथम कर्जाच्या रक्कमेची व्याजासह भरणा करून नंतर सदर व्यक्ती वर नियमानुसार  कारवाई केल्या जाईल.
- एम.बी. बन्साेडे
सहाय्यक निबंधक , रिसाेड

मी याेजनेचा लाभ घेतला असल्याने ते पैसे मी उदया बॅंकेत भरणार आहे.
- रंगराव लहानुजी गरकळ

Web Title: Government employees took advantage of the debt waiver scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.