शिरपुर येथे ‘गुड मॉर्निंग’ पथक गायब
By Admin | Updated: July 19, 2014 01:07 IST2014-07-19T00:42:09+5:302014-07-19T01:07:02+5:30
ग्रामस्वच्छता अभियान सद्यस्थितीत शिरपूरसह मालेगाव तालुक्यात थंडावले आहे.

शिरपुर येथे ‘गुड मॉर्निंग’ पथक गायब
शिरपूर जैन : चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून धुमधडाक्यात सुरू केलेले ग्रामस्वच्छता अभियान सद्यस्थितीत शिरपूरसह मालेगाव तालुक्यात थंडावले आहे. पहाटेच भेटी देणारे गुड मॉर्निंग पथक तर गायब झाल्यागत आहे. हगणदरीमुक् तीबाबत लावण्यात आलेल्या अनेक फलकाजवळचा परिसरच ह्यगोदरीह्ण बनल्याचे वास्तव आहे.
जि.प.चे तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांनी ही योजना प्रभावीपणे राबवित ग्रामीण भागातील गोदरीत सकाळी चार वाजतापासून आपल्या चमूसह हजेरी लावली होती. उघड्यावर शौचास बसणार्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केल्याने स्वच्छता अभियान यशस्वीतेकडे वाटचाल करीत होते. त्यानंतर मात्र सदर अभियानाची गती मंदावली आणि आता तर अभियान आहे की नाही? अशी शंका व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील पथकं गायब झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणार्यांची संख्या वाढली आहे. कोणत्याही प्रकारचा दंड, कारवाईचा बडगा, पथकाचा धाक न राहिल्यामुळे शौचालय बांधणीचे काम पुर्वीची तुलनेत आता कमी झाल्याचे दिसून येते. सद्यस्थि तीत मात्र ह्यस्वच्छता पथक नाही तर शौचालय बांधण्याची गरज नाहीह्ण या मानसिकतेपर्यंत नागरिक आले आहेत. कोणाला नोटीस नाही, दंड नाही. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणार्यांची संख्या वाढली आहे. याकडे स्वच्छता विभागाने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे.