उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना दिली समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 13:58 IST2018-10-05T13:58:44+5:302018-10-05T13:58:54+5:30
५ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावातील उघड्यावर शौचवारी करण्याºयांना गुड मार्निंग पथकाने समज दिली.

उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना दिली समज
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी ग्रामीण भागात उघड्यावरच शौचवारी सुरू असून, उघड्यावरील शौचवारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आले. ५ आॅक्टोबर रोजी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावातील उघड्यावर शौचवारी करण्याºयांना गुड मार्निंग पथकाने समज दिली.
ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनविण्याबरोबरच हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गत तीन-चार वर्षांपासून विशेष मोहिम राबविली. सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद प्रशासनाने १ लाख ९० हजार ८५४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झालेला आहे. कारंजा तालुक्यात २८ हजार ७३८, मालेगाव तालुक्यात ३४ हजार ९२७, मंगरूळपीर तालुक्यात २८ हजार ८३७, मानोरा तालुक्यात ३० हजार २२, रिसोड तालुक्यात ३५ हजार ७१, वाशिम तालुक्यातील ३३ हजार २५९ शौचालय बांधकामाचा समावेश आहे. जिल्हा हगणदरीमुक्त घोषित झाला असला तरी उघड्यावरील शौचवारी थांबता थांबेना, असेच काहीसे चित्र दिसून येते. शौचालय बांधकाम झाल्यानंतरही नागरिक शौचालयाचा वापर करीत नसल्याची बाब निदर्शनात येत आहे. या पृष्ठभूमीवर गुड मॉर्निंग पथक पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाने शुक्रवारी वाशिम तालुक्यातील जांभरुण महाली, काजळंबा, खरोळा गावाला सकाळच्या सुमारास भेटी दिल्या. यावेळी उघड्यावर शौचवारी करणाºयांना समज देऊन सोडून देण्यात आले. त्यानंतरही कुणी उघड्यावर शौचवारी करताना आढळून आले तर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला.