ग्रामसेवकांच्या संपामुळे गावप्रशासन झाले कुलूपबंद!
By Admin | Updated: July 14, 2014 23:33 IST2014-07-14T23:33:56+5:302014-07-14T23:33:56+5:30
तालुक्यातील ९१ ग्रामपंचायचे ग्रामसेवक गेल्या पंधरा दिवसापासून संपावर असल्यामुळे

ग्रामसेवकांच्या संपामुळे गावप्रशासन झाले कुलूपबंद!
कारंजा : गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायत नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावचे विकास कामे ग्रामसेवकांच्या सहकार्याने पुर्ण होतात. मात्र तालुक्यातील ९१ ग्रामपंचायचे ग्रामसेवक गेल्या पंधरा दिवसापासून संपावर असल्यामुळे गावातील विविध विकास कामे थांबली आहे. त्याबरोबर नागरीकांना व शालेय विद्यार्थ्यांंना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात ९१ ग्रामपंचायती अतंर्गत १0३ गावे कार्यरत आहे. त्याकरीता ५५ ग्रामसेवक काम करतात. मात्र हे ग्रामसेवक गेल्या पंधरा दिवसापासून संपावर असल्यामुळे गावातील रस्ते बांधणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीचे सोय, जन्म मृत्यृ विवाह नोंदी, सार्वजनिक स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था, गावातील बाजार स्वच्छता, कोंडवाडा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, नविन विकासात्मक योजना, नविन रोहयोच्या कामावर स्वाक्षरी, विशेष घटक योजनेच्या लाभार्थ्यांंना मिळणारे दाखले आदी कामे रखडली आहे. त्यामुळे गावातील नागरीक व विद्याथ्र्यी तालुका स्तरावर असणार्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर चकरा माराव्या लागत आहे. ग्रामसेवक संपावर असल्यामुळे गावात दररोज होणारी टॅक्सची वसूली थांबली आहे. गावागावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात रोगराई होउ नये म्हणुन होणारे फवारणीचे कामे थांबले आहेत. त्यामुळे रोगराई होण्याची भिती नाकारता येत नाही. तसेच प्रत्येक गावात पाण्यामध्ये ब्लिंचीग पावडर टाकल्या जात नाही. तर काही गावात कर्तव्यदक्ष असणारे शिफाई पाण्यामध्ये पावडर टाकण्याचे काम करीत आहे. पावसाळा असल्याने गावात स्वच्छता असणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामसेवकच नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.