गोवा-महाराष्ट्र राज्याचे निदेशक यांची नेहरू युवा मंडळाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:40 IST2021-03-10T04:40:36+5:302021-03-10T04:40:36+5:30

युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा नेहरू युवा केंद्र वाशिम संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळ केकतउमरा येथे ...

Goa-Maharashtra State Director visits Nehru Youth Board | गोवा-महाराष्ट्र राज्याचे निदेशक यांची नेहरू युवा मंडळाला भेट

गोवा-महाराष्ट्र राज्याचे निदेशक यांची नेहरू युवा मंडळाला भेट

युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार द्वारा नेहरू युवा केंद्र वाशिम संलग्नित नेहरू युवा बहुउद्देशिय मंडळ केकतउमरा येथे गोवा व महाराष्ट्र राज्याचे राज्य निदेशक प्रल्हाद सोनोने यांनी सोमवारी भेट दिली.

यावेळी नेहरू युवा केंद्र वाशिमचे जिल्हा युवा अधिकारी सम्यक मेश्राम, लेखापाल अनिल ढेंगे, तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादूर होते. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादूर यांनी नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती दिली. नेहरू युवा मंडळाला सन २०१०-२० चा स्वच्छ भारत समर इंटरशिप प्रथम पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला असून स्थानिक पातळीवर नेहरू युवा केंद्र तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पुरस्कार मिळविले आहेत.राज्य निदेशक प्रल्हाद सोनोने यांनी याप्रसंगी म्हटले की,नेहरू युवा केंद्राच्या वतीने ग्रामीण भागात काम करण्यासाठी एक संधी असून केकतउमरा येथील नेहरू युवा मंडळाचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात नेहरू युवा मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले. यावेळी मंडळाचे सदस्य पवन हरिमकर,विक्की पट्टेबहादूर,दीपक पट्टेबहादूर,रामप्रसाद गडकर,संदीप कांबळे, गोपाल गवांदे यांनी सोनोने यांचे स्वागत केले.

Web Title: Goa-Maharashtra State Director visits Nehru Youth Board