गरिबांना मदतीचा हात द्यावा : मेमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:23 IST2021-02-05T09:23:26+5:302021-02-05T09:23:26+5:30
येथील रहेमानीया कॉलोनीत मेमन समाजातील सहा गरीब गरजू लोकांसाठी मानोरा मेमन जमातच्या वतीने मेमन टाॅवर (घर )ची उभारणी केली. ...

गरिबांना मदतीचा हात द्यावा : मेमन
येथील रहेमानीया कॉलोनीत मेमन समाजातील सहा गरीब गरजू लोकांसाठी मानोरा मेमन जमातच्या वतीने मेमन टाॅवर (घर )ची उभारणी केली. २४ जानेवारी सकाळी ११ वाजता मेमन टावर उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व प्रथम हाफिज मनसब शाह यानी कुराणचे पठण करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाजी इकबाल मेमन होते. उद्घाटक म्हणून विदर्भ मेमन जमातचे अध्यक्ष हाजी बिलाल ठेकीया तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अ.अजीज मच्छीवाला, गुलाम मोहम्मद मिठू, शाकीर बाटलीवाला, रज्जाक लंघा, मो.हारुन सुपारीवाला, मो.सलीम आकबानी, अ.रऊफ टिक्की, मो.अनिस जानवानी, मो.युसूफ सलाट, मो.सलीम सुमार आदी उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानोरा मेमन जमात अध्यक्ष राउफ लंघा यांनी, तर सूत्रसंचालन कादर डोसानी यांनी केले. रऊफ लंघा यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विदर्भांतील आलेल्या प्रत्येक झोनल सेक्रेटरी, मेमन जमात अध्यक्ष यांचे शाल श्रीफळ आणि मोमेन्टो देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानोरा मेमन जमात अध्यक्ष अ.रऊफ लंघा, अ.गणी, मो.इद्रिस लंघा, मो.अमिन विच्छी, जाकीर लंघा, मो.अशफाक पोपटे, अ.करीम लंघा, अ.मजीद डब्बावाला, मो.अलताफ लंघा, मो.साजीद डब्बावाला, मो.इम्तीयाज सरमतीया यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी शहर व परिसरातील मेमन समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.