शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

सुसंस्कार  शिबिरातून मुलींना आत्मरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:55 PM

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे १७ मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, २७ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात मुलींना तज्ज्ञ मार्गदर्शक आणि संतांच्या सानिध्यात आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. 

ठळक मुद्देगुरुदेव सेवाश्रम व समस्त ग्रामवासियांच्या विद्यमाने १७ मे पासून बाल सूसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्यायाम, योगासने, लाठीकाठी, लेझिम, मनोरंजन खेळ व भजन संगीत आदिंचे शिक्षण दिले जात आहे. हरीभाऊ वेरुळकर गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात ६० ते ७० ठिकाणी सूसंस्कार शिबिरांचे आयोजन लोकसहभागातून करीत आहेत.

किन्हीराजा: मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे १७ मे पासून बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, २७ मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात मुलींना तज्ज्ञ मार्गदर्शक आणि संतांच्या सानिध्यात आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. किन्हीराजा येथील श्री गुरुदेव सेवाश्रम व समस्त ग्रामवासियांच्या विद्यमाने १७ मे पासून बाल सूसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सेवाभावी व प्रशिक्षीत शिक्षकांकडून बौद्धिक विषयांतर्गत आदर्श दिनचर्या, धर्मसभा, राष्ट्रीय एकात्मताा, चरित्र संवर्धन, थोर पुरु षाची जीवन चरित्रे, स्वावलंबन, आज्ञापालन, श्रमनिष्ठा, व्यसनमुक्ती, सेवा व शिस्त, स्वदेश प्रेम, नैतिक शिक्षण, निर्भयता, व्यक्तीमत्व विकास, सप्तकलागुणांचा विकास ग्रामगित, श्रीमद भागवत व गितेमधील निवडक ओव्या, आदर्श ग्रामनिर्माण, गोरक्षण, अंधश्रध्दा निर्मुलन, तसेच व्यायाम, योगासने, लाठीकाठी, लेझिम, मनोरंजन खेळ व भजन संगीत आदिंचे शिक्षण दिले जात आहे. त्याशिवाय मुलींना आत्मरक्षणाचे धडे दिले जात आहेत. यामध्ये लाठी काठीसह इतर कसरती शिकविल्या जात आहेत. या शिबिराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नारायणराव घुगे म्हणाले की, आजच्या धावपळीच्या जिवनात आई-वडिल, पालकांना आपल्या मुलामुलींवर संस्कार करण्यास वेळ उरलेला नाही. याचा विचार करूनच राष्ट्रसंतांचे अनुयायी हरीभाऊ वेरुळकर गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रात ६० ते ७० ठिकाणी सूसंस्कार शिबिरांचे आयोजन लोकसहभागातून करीत आहेत.  हा उपक्रम सामाजिक समरसतेचे दर्शन घडविणारा आहे. आजच्या काळात महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, महिला शोषणाच्या घटना चिंताजनक आहेत. हे टाळण्यासाठी नव तरुणींना स्वसंरक्षण करण्यासाठी या सूसंस्कार शिबिरात प्रशिक्षण दिले जाते, ही बाब अत्यंत चांगली आहे. शिबिर प्रमुख गणेश बोदडे गुरुजी, रविभाऊ गायकवाड, नंदकिशोर वरईकर, ज्ञानेश्वर मापारी, ही तज्ज्ञ शिक्षक मंडळ मुला, मुलींना मार्गदर्शनासह प्रशिक्षणही देत आहेत. यशस्वितेसाठी पांडुरंग खुरसडे, गजानन इंगळे, रविंद्र तायडे, मयूर इंगळे, गोपाल सरोदे, वैभव अंबोलकर, अभय राठोड, दत्ता खुरसडे, अक्षय इंगळे आदि मंडळी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिम