मुलीस पळवून नेणा-यावर गुन्हा दाखल

By Admin | Updated: January 19, 2017 02:16 IST2017-01-19T02:16:16+5:302017-01-19T02:16:16+5:30

कारंजा शहर पोलिसांत तक्रार दाखल; अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला केला आहे.

The girl filed a complaint against the accused | मुलीस पळवून नेणा-यावर गुन्हा दाखल

मुलीस पळवून नेणा-यावर गुन्हा दाखल

कारंजा लाड, दि. १८- येथील गुरुमंदिर परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीस मंगळवारी पळवून नेल्याची तक्रार कारंजा शहर पोलिसांत बुधवारी दाखल करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला केला आहे.
शहरातील गुरुमंदिर परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी मैत्रिणीसोबत बाहेर जात असल्याचे सांगून नव्यानेच खरेदी केलेल्या विना क्रमांकाच्या दुचाकीवर बसून गेली. ती बराच वेळ परत आली नाही. चौकशी करूनही माहिती मिळाली नाही. तिला कोणीतरी फूस लावून पळविल्याची शंका आहे, अशा स्वरूपाची तक्रार मुलीच्या पित्याने पोलिसांत दिली. त्यावरून कारंजा शहर पोलिसांनी कलम ३६३ नुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान वाठोरे तपास करीत आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कारंजा शहरात काही युवकांनी मुलींची छेड काढल्याची घटना घडली होती. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: The girl filed a complaint against the accused