घंटागाडी चालकांचे मानधन थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:26 AM2021-06-23T04:26:41+5:302021-06-23T04:26:41+5:30

मालेगाव नगरपंचायत येथे घंटागाडीवर मागील ४ वर्षांपासून चालक म्हणून काम करीत असताना गत ५ महिन्यांपासून आमचे मानधन थकीत ...

Ghantagadi driver's honorarium tired | घंटागाडी चालकांचे मानधन थकले

घंटागाडी चालकांचे मानधन थकले

Next

मालेगाव नगरपंचायत येथे घंटागाडीवर मागील ४ वर्षांपासून चालक म्हणून काम करीत असताना गत ५ महिन्यांपासून आमचे मानधन थकीत ठेवले आहेत . या कोरोना महामारीच्या काळात आम्ही आमच्या व घरच्यांच्या जिवाची पर्वा न करता एकनिष्ठेने काम केले आहे . तरीही आमचे मानधन थकीत ठेवले आहे. आम्हा सगळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे , मानधन मागितल्यास कर्तव्यावरुन काढण्यात येईल अशी संबंधिताकडून धमकी देण्यात येत आहे. मानधन त्वरित न दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा सचिन रोकडे, मंगेश कांबळे, लखन बळी , जितेंद्र डोंगरदिवे, सोहेल शहा, अक्षय इरतकर आदींनी दिला आहे.

--------------------------------

लसीकरणासाठी जनजागृती अभियान

काजळेश्वर उपाध्ये : कोविड-१९ चा संसर्ग होऊ नये, याकरिता ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना काजळेश्वर येथे लसीकरण जि.प. प्राथमिक शाळेत आरोग्य विभाग राबवत आहे.

आरोग्य पथकासह पं.स. सदस्य रंगराव धुर्वे लसीकरणाला प्रतिसाद मिळावा, याकरिता गावात जनजागृती अभियान राबवून लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत. कोरोनाला प्रतिबंध

करण्यासाठी व कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. कोरोना प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण यशस्वी करण्यास रंगराव धुर्वे यांचे सह आरोग्य कर्मचारी ए.जी. सोनोने, संदीप खुळे, कैलास पा. उपाध्ये, योगिता वानखडे, मंजू जाधव, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांचा समावेश आहे.

----------------

इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षणार्थी विभागात अव्वल

कारंजा : येथील शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्था इलेक्ट्रिशियनचे प्रशिक्षणार्थी अमरावती विभागात गुणवत्तेत पास झाले असून एकूण २० प्रशिक्षणार्थींपैकी अधिकाधिक विद्यार्थी ९० टक्केच्या गुणवत्तेने उतीर्ण झाले आहेत.

अखिल भारतीय स्तरावरील असलेल्या या परीक्षेत कारंजाचे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विजतंत्री व्यवसायातून प्रथम क्रमांकाने शुभम भगत ९६ टक्के, द्वितीय क्रमांकाने श्रीहरी गुजांटे ९४ टक्के, तर तृतीय क्रमांकाने शेख आकिब शेख अकिल ९२ टक्के व सुनील वडनेरकर ९२ टक्क्यांनी पास झाले असून ९० टक्केच्यावर अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: Ghantagadi driver's honorarium tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.