महामार्गावर अल्पावधीतच भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:28+5:302021-07-31T04:41:28+5:30

---- गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव ...

Get on the highway in a short time | महामार्गावर अल्पावधीतच भेगा

महामार्गावर अल्पावधीतच भेगा

----

गावांच्या मुख्य रस्त्यांवर उकिरडे

वाशिम : जिल्ह्यात ग्रामीण परिसरात रस्त्यावरच उकिरडे तयार झाले आहेत. या उकिरड्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हे उकिरडे साफ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

----

पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय

वाशिम : जिल्ह्यातील पांगरी नवघरेसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांवर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात साहित्य नेण्यात अडचणी येत आहेत.

--------------

इंझोरीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

वाशिम : खरीप हंगामातील पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इंझोरीसह परिसरातील काही गावांत कृषी विभागामार्फत कीड नियंत्रण आणि तण व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

-------------------

तलाठ्यांचे शहरातून अपडाऊन सुरूच

वाशिम : जिल्ह्यातील अनेक तलाठ्यांना कामकाज पाहण्यासाठी कार्यालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना शहरी भागातून अपडाऊन करावे लागत आहे. त्यातच ते मागील काही दिवसांपासून सुटीवर असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

--------------

मानोऱ्यात पोलिसांची संख्या अपुरी

वाशिम : पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत १०० पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कार्यरत पोलिसांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.

-------------

नाल्यांत घाण, गावांत अस्वच्छता

वाशिम : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींतील मान्सूनपूर्व कामे करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे नाल्या खच्च भरल्या असूप, सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याला धोका आहे. ग्रामपंचायतने मान्सूनपूर्व कामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी केली.

^^^^

Web Title: Get on the highway in a short time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.