वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली
By Admin | Updated: August 15, 2014 02:08 IST2014-08-15T02:04:36+5:302014-08-15T02:08:06+5:30
सर्वसाधारण सभेत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, योजनांची माहिती पुस्तीका बनवा, अशा विविध ठरावांसह अनेक विकासात्मक बाबींवर चर्चा

वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली
वाशिम : नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र शासनाने वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवावा, असा महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आला होता. तोच ठराव आज झालेल्या सर्वसाधारण सभेतही गाजला.
सर्वसाधारण सभेत जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, योजनांची माहिती पुस्तीका बनवा, जिल्हा परिषदेचे उत्पादन वाढवा, रस्ते व पुलांची कामे पूर्ण करा, अशा विविध ठरावांसह अनेक विकासात्मक बाबींवर सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. सायंकाळी ८ वाजेपर्यंत सभा सुरूच होती.
शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांच्या बदल्या, पशुसंवर्धन विभागामार्फत दिल्या जाणार्या योजना, शाळा- अंगणवाडी व आरोग्य केंद्राच्या इमारतींसह इतर शासकीय इमारतींची, दुरुस्ती, आरोग्य विभागामार्फत दिले जाणारे दुर्धर आजारासाठीचे अनुदान, पाणीटंचाई यासह विविध विषयांवर या सभेत चर्चा करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. च्या अध्यक्ष सोनाली जोगदंड होत्या. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला व बालकल्याण सभापती ज्योतिताई गणेशपुरे, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक वानखेडे यांची मंचावर उपस्थिती होती.
१४ ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी महिला ग्रामसभा झाल्या नसतील अशा ग्राम पंचायतींना कारणे दाखवा नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ठराव मांडणार्या सदस्यांचे समाधान सात दिवसात व्हावे, अशी अपेक्षा उस्मान गारवे यांनी व्यक्त केली.
आचारसंहिता लागण्यापूर्वी जास्तीत जास्त विकास कामे करुन अखर्चीत निधी खर्च करण्याच्या व जि. प. च्या योजना लोकांपयर्ंत पोचवा, त्यासाठी जनजागृती करा, अशा सूचना उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी विभाग प्रमुखांना दिल्या. एकंदरीत या सभेत विविध विकासकामांना गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत जि. प. सदस्य विकास गवळी, सचिन रोकडे, उस्मान गारवे, विश्वनाथ सानप, रत्नप्रभा घुगे, शिवदास पाटील, गजानन अमदाबादकर, चंदुभाऊ जाधव, श्यामराव बढे, रणजित जाधव, घुगे आदींनी प्रश्नांचा भडीमार केला; तसेच पंचायत समिती सभापती भास्कर पाटील, वीरेंद्र देशमुख, धनश्री राठोड यांनीही विविध विकास कामांबाबत चर्चा केली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे आणि संबंधित विभाग प्रमुखांनी सभागृहाच्या प्रश्नांना सर्मपक उत्तरे दिली. वित्त व लेखा अधिकारी हिवाळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अभियंता निलेश राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी मेहकरकर, लघुलेखक नागेश थोरात, उमेश बोरकर, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे, उपअभियंता एस. एम. मारके, शिरभाते, विनोद गिरी, मुकुंद नायक व जिल्हा परिषद जनसंपर्क अधिकारी राम ङ्म्रृंगारे व सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी सभेचे संचालन केले.