‘पाणीटंचाई’ व ‘रोहयो’ विषयावर गाजली सभा
By Admin | Updated: June 28, 2014 01:41 IST2014-06-28T01:07:32+5:302014-06-28T01:41:09+5:30
कारंजालाड पंचायत समिती; आढावा सभा

‘पाणीटंचाई’ व ‘रोहयो’ विषयावर गाजली सभा
कारंजालाड : येथील पंचायत समितीच्या सभागृहात २८ जून रोजी आढावा सभा झाली. ही सभा ह्य पाणीटंचाईह्ण व ह्यरोजगार हमी योजनाह्ण या विषयावरून चांगलीच गाजली.
सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश डहाके होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेन्द्र ताथोड, पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद लळे, जि.प.सदस्य बेबीताई चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, भूते, मोहन महाराज, पं.स.सदस्य मधुकर हिरडे, जगदेव पाटील थेर, नितीन नेमाने, प्रशांत ठाकरे, मनोहर गुळकर आदी उपस्थित होते.
सभेला तालुक्यातील कृषि विभाग, ग्रामीण पुरवठा विभाग, बँक प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संचालन व आभारप्रदर्शन गटविकास अधिकारी पी.एस.देशमुख यांनी केले.