मालेगावात ५६ हजारांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: August 31, 2015 01:18 IST2015-08-31T01:18:48+5:302015-08-31T01:18:48+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.

Gatka seized 56 thousand in Malegaon | मालेगावात ५६ हजारांचा गुटखा जप्त

मालेगावात ५६ हजारांचा गुटखा जप्त

मालेगाव (जि. वाशिम) : शहरातील सिद्धिविनायक मंदिराजवळ असलेल्या एका गोडावूनवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३0 ऑगस्ट रोजी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी ५६ हजार ६७८ रुपये किमतीचा गुटखा जप्त करून सचिन गोकुलप्रसाद यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मालेगाव शहरातील सचिन यादव याच्या घरासमोर असलेल्या गोडावूनमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी. बी. तडवी यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुरोशे, कैलास इंगळे, लक्ष्मण कोल्हे, राम चौबे, प्रदीप चव्हाण, विष्णू भोयर, रामेश्‍वर जगताप, सुनील चव्हासण, सुनील मुंदे, राहुल व्यवहारे, नंदकिशोर भडके, राजेश राठोड, रवी घरत, विपुल शेळके व मधुकर लांभाडे यांचा समावेश असलेल्या पथकाने संशयित गोडावूनवर छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांना ५६ हजार ६७८ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी सचिन यादव याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला. यानंतर या घटनेची अन्न पुरवठा सुरक्षा अधिकारी अजिंठेकर यांनी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली. पोलीसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Gatka seized 56 thousand in Malegaon