शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:34 PM

Washim News : युवकांनी शनिवारी  वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला गांधीगिरी करून हार घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन:  येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात मागील काही दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे गावातील युवकांनी शनिवारी  वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला गांधीगिरी करून हार घातला.मालेगाव तालुक्यात सर्वांत मोठे आरोग्य केंद्र म्हणून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राची ओळख आहे.या आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेता येथे किमान दोन वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र सध्या स्थितीत काही महिन्यांपासून एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आता ते सुद्धा मागील काही दिवसांपासून आरोग्यवर्धिनी केंद्रात हजर नाहीत. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे गावातील संदीप देशमुख, रोहित देशमुख, अंकुश देशमुख, सुमित देशमुख, संतोष अंभोरे यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी व्यक्त केली. 

शिरपूर येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वडील आजारी झाल्याने ते वडिलांच्या उपचारासाठी रजेवर गेले. दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. मात्र तेही आजारी झाले. सोमवारपर्यंत नवीन आरोग्य अधिकारी देण्यात येईल. -डॉ. श्याम गाभणे, अध्यक्ष जि.प.वाशिम 

 जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. शिरपूर येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वडिलांची प्रकृती अचानकपणे अस्वस्थ झाल्याने ते उपचारासाठी वडिलांना घेऊन औरंगाबाद येथे दवाखान्यात गेले आहेत. शिरपूर आरोग्यवर्धनी केंद्रात पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. -डॉ. संतोष बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी मालेगाव. 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन