शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 16:41 IST

वाशिम: जलसंधारणाच्या कामांसाठी राज्यभरात ओळख निर्माण झालेल्या वाशिम तालुक्यातील साखरा येथे लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा करण्या येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जलसंधारणाच्या कामांसाठी राज्यभरात ओळख निर्माण झालेल्या वाशिम तालुक्यातील साखरा येथे लोकसहभागातून धरणातील गाळ उपसा करण्या येत आहे. या कामाला गावकरी व शेतकºयांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने धरणातील गाळाचा वेगाने उपसा होत आहे. आदर्श साखरा येथे यापूर्वी लोकसहभागातून जलसंधारणाची विविध कामे करून हे गाव पाणीदार करण्यात गावकºयांनी मोठी भूमिका वठविली आहे. या ठिकाणी अडीच किलोमिटर नाल्याचे खोलीकरण झाल्याने गावातील तब्बल २५० हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याने शेतकºयांचे हरितक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असल्याचे दिसून येत आहे. १८९ घरांची वस्ती असलेल्या साखरा या गावातील १५० पेक्षा अधिक कुटूंबाचा व्यवसाय हा प्रामुख्याने शेती आहे. गावात सन २०११ पूर्वी दरवर्षी दुष्काळसदृष स्थिती निर्माण व्हायची. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करावी लागायची. दरम्यान, ग्रामस्थांना पाण्याचे महत्व कळाले आणि पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत मुरवून त्याचा उपयोग करण्याचे धोरण आखण्यात आले. त्यानंतर मात्र अख्खे गावच जलसाक्षरतेने झपाटले गेले. याच गावात गत १५ दिवसांपूर्वी ग्रामस्थ व शेतकºयांच्या सहकायार्ने लोकसहभागातून नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर आता येथील गावकºयांनी २९ जानेवारीपासून लोकसहभागातून धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. धरणातील गाळ उपशासाठी शेतकºयांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. धरणातून उपसण्यात आलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात टाकत आहेत. त्यामुळे धरणाची खोली वाढून साठवण क्षमतेत वाढ होणार आहेच शिवाय शेतात गाळ टाकल्याने जमीन कसदार होऊन शेतकºयांना दुहेरी लाभ या कामाचा मिळणार आहे. या कामासाठी शेतकरी तथा शिक्षक गजाननराव राऊत, जलमित्र तथा शिक्षणतज्ज्ञ सुखदेव आत्माराम इंगळे रामराव इंगळे, विठ्ठल आघम, महादेव राऊत, विठ्ठल इंगळे, गणेश महाले, सतीश इंगळे, गजानन इंगळे आदि गावकरी व शेतकरी परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :washimवाशिमDamधरण