जुगारावर धाड; १0 जणांवर कारवाई

By Admin | Updated: September 15, 2014 00:42 IST2014-09-15T00:42:14+5:302014-09-15T00:42:14+5:30

मालेगाव येथे जुगार अड्डय़ावर धाड टाकु न दहा हजाराचा ऐवज जप्त.

Gambling; Action on 10 people | जुगारावर धाड; १0 जणांवर कारवाई

जुगारावर धाड; १0 जणांवर कारवाई

मालेगाव : जुना बसस्थानकावर व पोलिस स्टेशन जवळ असलेला एका घरामध्ये पत्ते खेळत असलेल्या १0 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडुन त्यांच्याकडून ६,१५0 रुपये तसेच मोबाईल यांची एकूण किंमत ४ हजार रुपये असे एकूण १0,१५0 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जुना बस स्थानक परिसरात घराच्या मागील खोलीत ५२ पत्याचा जुगार खेळतांना एकूण १0 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यामध्ये महेश भुतडा, शाम अहिर, रवि इंगोले, बबलु मो.युसुफ,राजेश नंदाने, मो.जाफर मो.युसुफ, सुनिल बावणे, जगन वर्मा , मो.रिहान मो.उस्मान, मो.मुदशिर मो.रफीक यांचा समावेश असून महेश शेलकर घटना स्थळावरुन पसार झाले.
घटनास्थळावरुन पोलिसांनी ६१५0 रुपये राख्ो तसेच मोबाईल यांची एकूण किंमत ४ हजार रुपये असे एकूण १0१५0 रुपयांचा ऐवज केला आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक कुळवंत यांच्या फिर्यादीवरुन वरील ११ जणांविरुध्द कलम ४,५ मुंबई जुगार अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gambling; Action on 10 people