शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

जुगाऱ्यांचे धाबे दणाणले; धाडसत्रात २० जणांवर गुन्हा, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

By सुनील काकडे | Updated: May 11, 2024 19:56 IST

याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ८१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाशिम : जिल्ह्यातील कारंजा ग्रामिण पोलिसांच्या पथकाने १० मे रोजी ‘ॲक्शन मोड’वर येत शहरात तीन ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ८१ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून कारंजा शहरात विविध ठिकाणी राजरोसपणे जुगार अड्डे चालवून हार-जितचा खेळ रंगला होता. त्याची दखल घेत ग्रामिण पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी तीन विशेष पथक नेमून १० मे रोजी धाडसत्र राबविले. यादरम्यान शहर पो.स्टे. हद्दीतील झाशी राणी चौकातील श्रीजल वाईनबारच्या पाठीमागे दुर्गेश सुरजुसे, विजय मेश्राम, सलिम लचमन निन्सूरवाले, नंदू चव्हाण, सुनिलअण्णा उपाध्ये यांना ताब्यात घेवून रोख ७६५० रुपयांसह १ लाख ७२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसऱ्या पथकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील हॉटेल विसावाच्या मागे धाड टाकून गजानन गायकवाड, राजेश लाड, ललित पद्मशी खोना व दिनकर लाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. तसेच तिसऱ्या पथकाने मारवाडी पुरा येथील अग्रवाल यांच्या वाड्यात धाड टाकून पवन श्रीराम राय, महेश अहेरराव, संजय धुवार्य, प्रशांत पातूरकर, मोहन गोघलिया, आकाराम वंजारी, अब्दुल रफीक अब्दुल शहीद, प्रकाश मुमाने, रहीम अन्नू कामनावाले, संदीप रावेकर, सुनील गायकवाड यांना ताब्यात घेवून रोख ४२ हजार १२० रुपयांसह ५२ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शहर पो.स्टे.च्या हद्दीत ग्रामिण पोलिसांची कारवाईजुगार अड्डे चालत असलेली तीन्ही ठिकाणे शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतात. असे असताना ग्रामिण पोलिसांच्या पथकाने धडाकेबाज कारवाया करून २० जुगाऱ्यांवर कारवाई केली. शहर पो.स्टे.च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही बाब अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी