गजानन महाराजांची पालखी मंगळवारी मालेगाव तालुक्यात!
By Admin | Updated: June 1, 2017 01:06 IST2017-06-01T01:06:31+5:302017-06-01T01:06:31+5:30
मालेगाव : श्रीक्षेत्र, पंढरपुरकडे जाणाऱ्या शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांच्या पायदळ पालखीचे वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यात ६ जून रोजी आगमन होत आहे.

गजानन महाराजांची पालखी मंगळवारी मालेगाव तालुक्यात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : श्रीक्षेत्र, पंढरपुरकडे जाणाऱ्या शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांच्या पायदळ पालखीचे वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यात ६ जून रोजी आगमन होत आहे.
आषाढी एकादशी निमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी ही दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपूरकडे जात असते. ७०० ते ७५० वारकरी मंडळीसह सूशोभीत रथावर असलेला संत गजानन महाराजांचा मुखवटा व मूर्तीसह निघालेल्या या पालखीचे मालेगाव तालुक्यात मेडशी येथे ६ जून रोजी सकाळी आगमन होईल. तेथे पालखीचे गावकऱ्यातर्फे भव्य स्वागत होणार असून सायंकाळी ६ वाजता ही पालखी श्री नाथांच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र डव्हा येथे पोहोचेल. डव्हा संस्थानच्यावतीने पालखीचे स्वागत होईल. ही पालखी डव्हा येथे मुक्कामी राहणार आहे.
श्री क्षेत्र डव्हा येथे मुक्कामी असणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या या भव्य पायदळ पालखीचे आगमन ७ जून रोजी ६ वाजता मालेगाव शहरात येईल. मालेगाव येथे पालखीचे सानेगुरुजी नगरापासून भाविकांतर्फे स्वागत करण्यात येणार आहे, तर स्वागतासाठी जागोजागी कमानी उभारून रस्त्यावर सडा रांगोळया काढण्यात येणार आहे. पालखी आगमनानिमित्त सहभागी वारकरी मंडळीची शहरातील नागरिकांतर्फे सामाजिक संघटना, अधिकारी, कर्मचारी मंडळी व भाविकांना अल्पोपहार चहा, सरबत, पिण्याचे पाणी, उपयोगी साहित्य वाटपाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.