गजानन महाराजांच्या पालखीने नगरी दुमदुमली!
By Admin | Updated: June 6, 2017 19:44 IST2017-06-06T19:44:08+5:302017-06-06T19:44:08+5:30
मेडशी : गण गण गणात बोतेच्या गजरात मेडशी येथे शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाल्याबरोबर संपूर्ण नगरी ६ जून रोजी दुमदुमून गेली होती.

गजानन महाराजांच्या पालखीने नगरी दुमदुमली!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेडशी : गण गण गणात बोतेच्या गजरात मेडशी येथे शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाल्याबरोबर संपूर्ण नगरी ६ जून रोजी दुमदुमून गेली होती.
शेगाव संस्थानची श्री संत गजानन महाराज पालखीचे ६ जून रोजी मेडशी येथे सकाळी १०.३० वाजता आगमन झाले. पालखी येणार असल्याने पंचक्रोशितील शेकडो भाविक भक्त दर्शनासाठी आले होते. दरवर्षी प्रमाणे येथील शिवभवन येथ पालखीचे आगमन झाले व ११.३० वाजता वनपरिक्षेत्र कार्यालयात श्रींच्या पालखीचे दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
श्रीं च्या पालखी सोबत ६५० वारकरी मंडळीसह ३ अश्व, ९ वाहने असून वारकऱ्यांकरीता रुग्णवाहिका, डॉक्टरमंडळी आहेत. पालखीच्या स्वागत पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे, पिंटु बहादुरे, बबन आप्पा तोंडकर, कैलास तोंडकर, मधुकर बहादुरे, भागवत शिंदे, अजय वरुळकर, शिव गणेश मंडळाने जल्लोषात केले. तसेच परंपरेनुसार पाठक परिवाराने पूजा अर्चा करुन पालखीचे स्वागत केले. माजी सरपंच डॉ. सुभाष मंत्री, संतोष मंत्री व परिवाराने स्वागत केले. यावेळी प्रियाताई पाठक, प्रदिप पाठक, शैलेश पाठक, प्रसाद पाठक, माणिक मुंढे, दिलीप जैन आदिनंी पालखीचे स्वागत केल्यानंतर पालखी गांधी चौकात पोहचली. येथे माजी सरपंच संजयराव घ्ज्ञुगे, बबन विटकरे,उत्तम विटकरे, पांडुरंग विटकरे, वासुदेवराव घुगे, डॉ. बाळासाहेब घुगे, डॉ. बाबासाहेब घुगे, प्रेमचंद जैन , वामन साठे, संतोष साठे आदिंनी स्वागत केले. तसेच पालखी पुढे गेल्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मुकूंदराव मेडशीकर, माजी पंचायत समिती सदस्य रणजीत मेडशीकर , अभिजित मेडशाीकर, बाळु पिंपळकर, गजानन महाराज पिंपळकर, बाळु थोरात, किशोर सावरकर, सुनिल घुगे तर वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपाल एस.एस. तायडे, यु. आर .राऊत आदिंनीस्वागत केले. श्रींच्या पालखीच्या दर्शनाकरिता कोळदरा, गोंधळवाडी, वाकळवाडी, उमरवाडी, काळा कामठा, पिंपळदरा, अंधारसावंगी, भौरद, भिलदुर्ग, गोकसावंगी मुंगळा सह पंचक्रोशितील भाविक भक्तांनी लाभ घेतला. यावेळी कळंम महाराजांचे प्रवचन झाले. जिल्हा परिषद शाळेत पालखीने विसावा घेतला व मध्यान्हाचे भोजन करुन पालखी पुढे ब्राम्हणवाडा मार्गे श्री क्षेत्र डव्हाकरीता रवाना झाली.