नंदकिशोर नारे
वाशिम : जिल्ह्यात गत ६ दिवसांमध्ये एक घरफाेडी, १२ ठिकाणी चाेरीच्या घटनांमधून तब्बल ११ लाख रुपयांच्या मुद्देमालासह राेख चाेरट्यांनी पळविली. विशेष म्हणजे या सर्व घटना ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबरदरम्यानच्या आहेत. ९ सप्टेंबर राेजी पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांची बदली हाेऊन त्यांच्या जागी बच्चन सिंह नवे पाेलीस अधीक्षक आलेत. ते रुजू हाेण्याआधीच चाेरट्यांनी त्यांना सलामी दिल्याचे बाेलले जातेय. काही जण तर चक्क बच्चन येण्याआधीच गब्बरसिंगांनी (चाेरट्यांनी) सलामी दिल्याचे बाेलताना दिसून येत आहेत.
९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबरदरम्यान मुंगळा येथे दाेन ठिकाणी घरफाेडी हाेऊन ८ लाख रुपयांच्या मुद्देमालासाह काही राेख अज्ञात चाेरट्यांनी पळविली. त्याच दिवशी शिरपूर हद्दीत येणाऱ्या ४ गावांत ७ ठिकाणी चाेरीच्या घटना घडल्यात यामध्ये २ लाखांचा, तर १३ सप्टेंबर राेजी ‘बेताब’, ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ या सुपरहीट चित्रपटाचे दिग्दर्शक लीलाधर सावंत यांच्या जऊळका येथील राहत्या घरी ४३ लाख रुपयांवर अज्ञात चाेरटयांनी हात सफा केल्याची घटना घडली आहे.
पाेलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना एक प्रकारे हे चाेरट्यांचे आव्हानच म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सध्या सर्वत्र गणेशाेत्सव सुरू असून, संपूर्ण पाेलीस विभाग या बंदाेबस्तात दिसून येत असल्याने चाेरट्यांना चांगलेच फावले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
........................
गणेशाेत्सव बंदाेबस्त व्यस्ततेत असतानाही अवैध गुटख्याकडे लक्ष; अडीच लाखांचा माल जप्त
गणेशाेत्सव काळात जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील पाेलिसांसह इतर जिल्ह्यांतील पाेलीस कुमक बाेलावून पाेलीस विभाग व्यस्त दिसून येत आहे. या व्यस्ततेतही इतर घटना घडामाेडींवर पाेलिसांचे बारीक लक्ष दिसून येत आहे. जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री, खरेदीचे लाेण माेठ्या प्रमाणात पसरले आहे. यावर अंकुश ठेवण्याकरिता पाेलीस कसाेशीने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. गणेशाेत्सव काळातही १० सप्टेंबर राेजी पाेलिसांनी मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे व कारंजा येथे अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. अनुक्रमे २ लाख व ६५ हजारांचा गुटखासुद्धा जप्त करण्यात आला.
हत्येच्या घटनेने पाेलिसांची वाढविली डाेकेदुखी
मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे परिसरात बंदुकीच्या गाेळ्या झाडून एका इसमाची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. मृतक नागपूर परिसरातील असून, त्याची हत्या कुठे झाली, प्रेत कोणी आणून टाकून दिले, याचा तपास गणेशाेत्सवाच्या व्यस्ततेतही पाेलीस करीत आहेत.