जवान धोपेंवर आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 04:58 IST2018-09-21T04:58:42+5:302018-09-21T04:58:45+5:30

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी धोपे कुटुंबाने जवान सुनील धोपे यांचे पार्थिव स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

Funeral today in Jawan Dhopen | जवान धोपेंवर आज अंत्यसंस्कार

जवान धोपेंवर आज अंत्यसंस्कार

कारंजा लाड (वाशिम) : सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी धोपे कुटुंबाने जवान सुनील धोपे यांचे पार्थिव स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे शुक्रवारी कारंजा येथे लष्करी इतमामात धोपे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सिलाँग येथे कार्यरत असताना सुनील (३७) यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. याबाबत कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. ती पूर्ण होत नाही, तोवर पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला होता. चार दिवसांपासून कारंजा येथे बंदही पाळण्यात आला होता.

Web Title: Funeral today in Jawan Dhopen