यशवंतनगर-आमकिन्ही रस्त्यासाठी २० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST2021-06-17T04:27:59+5:302021-06-17T04:27:59+5:30

श्री क्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजबांधवांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यासह परराज्यातून बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. ...

Fund of Rs. 20 crore for Yashwantnagar-Amkinhi road | यशवंतनगर-आमकिन्ही रस्त्यासाठी २० कोटींचा निधी

यशवंतनगर-आमकिन्ही रस्त्यासाठी २० कोटींचा निधी

श्री क्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजबांधवांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी राज्यासह परराज्यातून बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. भाविकांना येथे विनासायास जाता यावे, यासाठी पोहरादेवीला जाणारे रस्ते सुस्थितीत असावेत, अशी भाविकांची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील यशवंतनगर ते पोहरादेवी -आमकिन्ही (इजिमा ६८) रस्ता या २२.७० किमी रस्त्याचा दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आला होता. यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता या रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Fund of Rs. 20 crore for Yashwantnagar-Amkinhi road