शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

फळ, भाजीपाला विक्रेत्यांचीही होणार कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 16:34 IST

Corona Test सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.

वाशिम :  कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडी बाजारासाठी विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून दिली असून, वाशिम शहरातील पाटणी चौकस्थित भाजीबाजार अन्यत्र हलविण्यात आला. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीपाला विक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी होणार असून, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वाशिमचे तहसिलदार विजय साळवे यांनी रविवारी केले.वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. भाजीपाला, फळे विक्रेत्यांना विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देऊन एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्याअनुषंगाने वाशिम येथील पाटणी चौकातील भाजीबाजारासाठी विकेंद्रित स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली. पाटणी चौकातील भाजीबाजार बंद केला असून, काटा रोड, लाखाळा रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी विक्रेंदीत स्वरुपात भाजीबाजार भरविण्यात आला. बाजार समिती आवारातील भाजीबाजाराला रविवारी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसिलदार विजय साळवे, ठाणेदार ध्रूवास बावनकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मास्क न वापरणाºया काही विक्रेत्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, सावधगिरीचा उपाय म्हणून फेरीवाले, फळ व भाजीविक्रेत्यांचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे. यापुढे कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र या विक्रेत्यांना सोबत बाळगावे लागणार आहे. कोरोना चाचणी न करणाºयांना भाजीपाला, फळ व किरकोळ वस्तू विकता येणार नाहीत. वाशिम शहरातील फेरीवाले, फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसिलदार साळवे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या