कारंजातील एका बालकामगाराची मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:25+5:302021-07-10T04:28:25+5:30
बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी ७ जुलै रोजी कारंजा येथे धाडसत्र घेण्यात आले. तपासणीदरम्यान दारव्हा रोड परिसरातील घोटकर ...

कारंजातील एका बालकामगाराची मुक्तता
बालकामगार या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी ७ जुलै रोजी कारंजा येथे धाडसत्र घेण्यात आले. तपासणीदरम्यान दारव्हा रोड परिसरातील घोटकर ऑटोमोबाईल्स या आस्थापनेत एक बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आल्याने कृती दलाने त्यास मुक्त करून, संबंधित आस्थापनाधारक विक्की रामदास घोटकरविरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
धाडसत्र यशस्वी करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी गौरवकुमार नालिंदे, दुकाने निरीक्षक विनोद जोशी, उपशिक्षणाधिकारी देशमुख, चाईल्ड लाईनचे समन्वयक महेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल गाडवे, किरण तेलगोटे यांनी कार्यवाही केली.
...................
नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
कोणत्याही आस्थापनेत बालकामगार असल्यास, त्याबाबत नागरिक, पोलीस अधिकारी किंवा सरकारी कामगार अधिकारी तक्रार नोंदवू शकतात. कायद्याचे उल्लंघन केल्यास काम करून घेणाऱ्यावर कलम १४ अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येते. बालकामगार या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी नालिंदे यांनी केले आहे.