सहा शासकीय रुग्णालयांत फ्री, तर ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांत लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST2021-03-01T04:49:08+5:302021-03-01T04:49:08+5:30

आरोग्य विभागाने १ मार्चपासून सर्वसामान्यांतील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसह ४५ वर्षे वयांवरील गंभीर आजारग्रस्त रुग्णांना कोरोना प्रतिबंधक ...

Free vaccine in six government hospitals and Rs. 250 in 9 private hospitals | सहा शासकीय रुग्णालयांत फ्री, तर ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांत लस

सहा शासकीय रुग्णालयांत फ्री, तर ९ खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांत लस

आरोग्य विभागाने १ मार्चपासून सर्वसामान्यांतील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसह ४५ वर्षे वयांवरील गंभीर आजारग्रस्त रुग्णांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सर्व नियोजन केले आहे. शासनाच्या सूचनेनुसार या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार असून, यात खासगी दवाखान्यांची ई-पॅनलद्वारे निवड केली आहे. जिल्ह्यातील ९ खासगी आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे. लोकांना नोंदणी केल्यानंतर लस टोचून घेण्याची तारीख देण्यात येणार असून, त्या तारखेला लसीसाठी बोलावले जाणार आहे.

-------

मोबाइल अ‍ॅपवरही नोंदणी

आरोग्य विभागाकडून सर्वसामान्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत पहिल्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजारग्रस्त लोकांना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन २ अ‍ॅपद्वारे अ‍ॅण्डॉइड मोबाइलवर लस घेऊन इच्छिणाऱ्यांना नोंदणी करता येणार असून, संबंधित लसीकरण केंद्रावरही प्रत्यक्ष नोंदणीची व्यवस्था करण्याची तयारी सुुरू आहे.

-----

ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारग्रस्तांनाच लस

शासनाकडून पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचारी आणि खासगी आरोग्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात झाल्यानंतर आता ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, तसेच ४५ वर्षे वयावरील गंभीर आजारग्रस्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

-------------

पहिल्या टप्प्यातील ३१४५ जण बाकी

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा म्हणून कार्य करणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी आरोग्य संस्थांमधील सदस्य मिळून १०५४१ लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ७४३४ लोकांना लस देण्यात आली असून, ३१०७ अधिकारी, कर्मचारी बाकी आहेत.

---------------

येथे मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

सरकारी रुग्णालये

१) जिल्हा सामान्य रुग्णालय

२) कारंजा उपजिल्हा रुग्णालय

३) मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालय

४) रिसोड ग्रामीण रुग्णालय

५) मालेगाव ग्रामीण रुग्णालय

६) मानोरा ग्रामीण रुग्णालय

७) रेनॉल्ड्स हॉस्पिटल, वाशिम

-----------------

खासगी रुग्णालये

१) डॉ. व्होरा हॉस्पिटल, वाशिम

२) मॉ गंला मेमोरियल हॉस्पिटल, वाशिम

३) बालाजी बालरुग्णालय, वाशिम

४) बाजड हॉस्पिटल, वाशिम

५) वाशिम क्रिटिकल केअर सेंटर, वाशिम

६) लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

७) बिबेकर हॉस्पिटल, वाशिम

८) देवळे हॉस्पिटल, वाशिम

९) कानडे हॉस्पिटल, वाशिम

Web Title: Free vaccine in six government hospitals and Rs. 250 in 9 private hospitals