मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांना मोफत लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:15 IST2018-07-28T13:14:02+5:302018-07-28T13:15:11+5:30

जनावरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, मालेगाव अंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांची मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 

Free vaccination campaign for animals in rural areas of Malegaon taluka | मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांना मोफत लसीकरण मोहीम

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांना मोफत लसीकरण मोहीम

ठळक मुद्देरोग जंतुचा मोठयाप्रमाणात  प्रसार होत असल्यामुळे जनावरे रोगास बळी पडतात.  या रोगावर प्रभावी लसीकरण करून निरोगी ठेवण्याकरिता पिपिआर लस जनावरांना देण्यात आली.  


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  : पावसाळयातील हवामान हे विविध रोगास कारणीभुत असून जंतुच्या प्रसार व वाढीस पोषक असल्याने विविध प्रकारचे व्यवस्थापन करून अगदी योग्यवेळी लसीकरण करून जनावरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक, मालेगाव अंतर्गत मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांची मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 
उन्हाळया हिरवा चारा मिळत नसल्याने, पावसाळयात सतत जनावरे एकाच जागी बांधल्याने , पिण्याच्या पाण्यामुळे रोग जंतुचा मोठयाप्रमाणात  प्रसार होत असल्यामुळे जनावरे रोगास बळी पडतात.  पिपीआर ही विषाणूजन्य आजार शेळया मेंढयाकरिता अत्यंत घातक असल्यामुळे या रोगावर प्रभावी लसीकरण करून निरोगी ठेवण्याकरिता पिपिआर लस जनावरांना देण्यात आली.  सोबतच आजारी जनावराची निगा कशी राखावी व इतर जनांरावाना आजार होणार नाही याकरिता कोणती काळजी घ्यावी याबाबत पशुधन पर्यवेक्षक डॉ.सुनिता सोळंके यांनी माहिती दिली. लसीकरण मोहीमेत डॉ.विकास पटेबहादूर , डॉ.मिलींद जाधव, डॉ.रवि गवई यांनी सहभाग नोंदविा लसीकरण पशुपालकांचे सहाकर्य मिळत आहे.

Web Title: Free vaccination campaign for animals in rural areas of Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.