जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST2021-06-28T04:27:51+5:302021-06-28T04:27:51+5:30
या प्रसंगी संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुधीर गावंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार जाधव, डॉ.अमित बिडवे, रक्तपेढी सहायक संदीप वानखेडे, समुपदेशक अक्षय ...

जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर
या प्रसंगी संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुधीर गावंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार जाधव, डॉ.अमित बिडवे, रक्तपेढी सहायक संदीप वानखेडे, समुपदेशक अक्षय राठोड, सामाजिक कार्यकर्ता दिनेश गायकवाड, पियर एज्युकेटर प्रेम लोणारे, परिचारिका आराधना सावळे उपस्थित होते. यावेळी डॉ.तुषार जाधव यांनी उपस्थित रुग्णांना व्यसनासंदर्भात मार्गदर्शन केले व त्यांनी त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. संस्थेचे प्रकल्प अधिकारी सुधीर गावंडे यांंनी व्यसनामुळे होणारे सामाजिक नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्त्व पटवून दिले. संपूर्ण कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व शांततेने पार पडला.
---------------------
आठ गावांतील ग्रामस्थांना लाभ
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्यावर आयोजित कार्यक्रमाचा लाभ राजगाव, कनेरगाव, मोप, कान्हेरखेड, सायखेडा, सुकली, तोंडगाव, उकळी आदी आठ गावांतील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनीही या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
===Photopath===
270621\27wsm_1_27062021_35.jpg
===Caption===
मोफत आरोग्य शिबिर