हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी वाणाचे मोफत वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:56+5:302021-02-05T09:25:56+5:30
विदर्भात उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवते. हिरव्या चाऱ्याअभावी गुरांचे आरोग्य खालावते. उन्हाळ्याच्या दिवसात गुरांच्या आरोग्यासाठी ...

हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी वाणाचे मोफत वितरण
विदर्भात उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे हिरव्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवते. हिरव्या चाऱ्याअभावी गुरांचे आरोग्य खालावते. उन्हाळ्याच्या दिवसात गुरांच्या आरोग्यासाठी हिरव्या चाऱ्यासोबतच शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक बाजरी मिळावी म्हणून योगायोग शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनोज जाधव यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बायफ बाजरी-१ या बाजरीच्या सुधारित वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना मोफत वितरित केले. यावेळी रिसोड तालुक्यातील पशुपालक ज्ञानेश्वर शेळके, सुभाष शेळके, विजय झरे, गोकुळ लाटे, प्रशांत पांडे, गजानन खडसे, नामदेव वायबसे, जाधव, परसराम मुंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्रातील सहाय्य्क आदित्य देशमुख याचे मोलाचे सहकार्य लाभले. बाजरीचे हे वाण पालेदार, रसाळ, गोड, लव विरहित, उंच वाढणारी, भरपूर फुटवे असणारी, चाऱ्याचे जास्त उत्पादन देणारी, जोमाने वाढणारी असून, या वाणापासून पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत तीन कापण्या मिळून भरपूर प्रमाणात चांगल्या प्रतीचा चारा मिळतो . उन्हाळ्यात फेब्रुवारी पेरणीमध्ये ज्वारीपेक्षा मका कमी पाण्यावर येते आणि जास्त उत्पादन मिळते, असे यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी या वाणाची माहिती देताना सांगितले.
===Photopath===
020221\02wsm_1_02022021_35.jpg
===Caption===
हिरव्या चाऱ्यासाठी बाजरी वाणाचे मोफत वितरण