शिवीगाळ व मारहाणप्रकरणी चार जणांना कारावास!
By Admin | Updated: March 31, 2017 02:29 IST2017-03-31T02:24:06+5:302017-03-31T02:29:18+5:30
न्यायालयाने दोन महिलांसह चार जणांना १ वर्षे कारावास, दंडाची शिक्षा सुनावली आहे.
_ns.jpg)
शिवीगाळ व मारहाणप्रकरणी चार जणांना कारावास!
मंगरुळपीर(जि. वाशिम), दि. ३0- महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने दोन महिलांसह चार जणांना १ वर्षे कारावास व प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा गुरूवार, ३0 मार्च रोजी सुनावली आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सुमित्राबाई सुदाम चव्हाण (रा.कळंबा) या महिलेने ३१ मे २0१४ रोजी आसेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, की ती किराणा दुकानात गेली असता, आरोपी मनोहर काळूसिंग जाधव याने क्षुल्लक कारणावरून हातावर लोखंडी पाइपने मारहाण केली. फिर्यादीचे मुलीस किरण राठोड व अन्य दोन महिलांनी शिवीगाळ करुन मारहाण केली, अशा तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते.