ऑनलाइन शिक्षणामुळे बाराखडीचा पडतोय विसर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST2021-09-03T04:44:37+5:302021-09-03T04:44:37+5:30

वाशिम : कोरोनामुळे आताही शाळा बंद असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. लहान मुलांना प्रत्यक्ष शिक्षण नसल्याने ...

Forget about falling apart due to online education! | ऑनलाइन शिक्षणामुळे बाराखडीचा पडतोय विसर !

ऑनलाइन शिक्षणामुळे बाराखडीचा पडतोय विसर !

वाशिम : कोरोनामुळे आताही शाळा बंद असून, ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. लहान मुलांना प्रत्यक्ष शिक्षण नसल्याने बाराखडी आणि उजळणीचा विसर पडत असल्याचे दिसून येते.

कोरोनामुळे गतवर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने ऑनलाइन शिक्षणाची सुविधा केली आहे. यंदाही प्रत्यक्ष शिक्षणासाठी आतापर्यंत प्राथमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. या वर्गातील मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाईल पडतात. शाळेत प्रत्यक्ष दिले जात असलेले शिक्षण प्रभावी असल्याने दुसरीपासूनच मुलांना बाराखडी, उजळणी मुखपाठ असते. परंतु गत दीड वर्षांपासून शाळेपासून दुरावलेल्या मुलांना जोडशब्दांचे वाचन करणे कठीण जात आहे. दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शाळा पाहिली नाही किंवा गुरुजींची भेट झाली नाही तसेच बाराखडी अक्षरे गिरविले नाहीत.

Web Title: Forget about falling apart due to online education!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.