आयपीएल सट्टयावर धाड; ३.६४ लाखांचा

By Admin | Updated: May 18, 2017 19:38 IST2017-05-18T19:38:38+5:302017-05-18T19:38:38+5:30

मुद्देमाल जप्त, पाच आरोपींना अटक!

Foray on IPL flat; 3.64 lakhs | आयपीएल सट्टयावर धाड; ३.६४ लाखांचा

आयपीएल सट्टयावर धाड; ३.६४ लाखांचा

ऑनलाइन लोकमत
वाशिम : गुन्हेगारीवर वचक मिळविण्याकरिता गठीत करण्यात आलेले विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून वाशिममधील सौदागरपुरा परिसरात आयपीएल क्रिकेट सट्टयावर धाड टाकली. यावेळी क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या पाच आरोपींना जेरबंद करून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १७ मे रोजी सायंकाळी करण्यात आली.

वाशिम शहरात आयपीएल क्रिकेटवर जुगार खेळविला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक किरण साळवे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सौदागरपुरा परिसरात फराईमभाई इस्माईलभाई यांच्या नवीन बांधकाम असलेल्या इमारतीत धाड टाकली. यावेळी आरोपी तेथे आयपीएलमधील हैद्राबादविरूद्ध कलकत्ता नाईट राईडर्स या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोनव्दारे पैशाची बेटींग लावून जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पंचासमक्ष आरोपी कैलास संजयकुमार बसंतवाणी (वय २१ वर्षे, रा.सिंधी कॉलनी, वाशिम), अंकीत अशोक वर्मा (वय २७ वर्षे, रा.गुरुवार बाजार, वाशिम), अमीत मनोज रुपचंदाणी (वय २१ वर्षे, रा.सिंधी कॉलनी, वाशिम), राहूल जयंत पारसवाणी (वय २५ वर्षे, रा.सिंधी कॉलनी वाशिम), अजहर अहमद मकसूद अहमद (वय ४३ वर्षे, रा.पठाणपुरा, वाशिम) या पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम ४९ हजार २५० रुपयांसह ३ लाख ६४ हजार रुपयांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींना अटक करण्यात आली. 

Web Title: Foray on IPL flat; 3.64 lakhs