शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सोने, चांदीच्या दरात चढ-उतार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:42 IST

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मूल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक ...

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मूल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीकडे वळले होते. त्यामुळे सोने, चांदीच्या दरात वाढ होत गेली. कोरोना काळात गुंतवणुकीचा चांगला आणि खात्रीलायक पर्याय म्हणून गुंतवणूकदार हे सोने, चांदीमध्ये गुंंतवणूक करीत असल्याने मध्यंतरी सराफा बाजारात चांगलीच तेजी आली होती.

अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्ववत झाली असून, उलाढालही वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून अन्य क्षेत्रालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे.

कधी सोने, चांदीला झळाळी मिळते तर कधी दरात घसरण होते. गत ११ दिवसांतील बाजारभाव विचारात घेतले, तर सोने प्रतितोळा १००० रुपयांनी स्वस्त झाले, तर चांदी प्रतिकिलो २,००० रुपयाने महागल्याचे दिसून येते. ११ फेब्रुवारी रोजी सोने प्रतितोळा ४८ हजार ३०० रुपये, तर चांदी प्रतिकिलो ६९ हजार रुपये असे दर होते. २३ फेब्रुवारी रोजी सोने प्रतितोळा ४७ हजार ३०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ७१ हजार रुपये असे दर होते.