पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:30 IST2017-10-04T02:28:35+5:302017-10-04T02:30:39+5:30

वाशिम:  हिंगोली मार्गावर असलेल्या बिलाल नगरमध्ये एका  पाच वर्षाच्या चिमुकलीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बला त्कार केल्याची धक्कादायक घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी २  वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अल्पवयीन  मुलाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. 

Five-year-old Chimukuli on the subject! | पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग!

पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग!

ठळक मुद्देअल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना१५ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम:  हिंगोली मार्गावर असलेल्या बिलाल नगरमध्ये एका  पाच वर्षाच्या चिमुकलीवर १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने बला त्कार केल्याची धक्कादायक घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी २  वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अल्पवयीन  मुलाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. 
याबाबत प्राप्त माहितीनुसार, बिलाल नगर (वाशिम) मधील  एका पंधरा वर्षीय मुलाने पाच वर्षीय चिमुकलीला घरामध्ये  बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. पीडित चिमुकलीने घरी पर तल्यावर आपल्या आईला आपबिती सांगितली. पीडित मुलीच्या  आईने शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असून,  पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ४,  १२ बाललैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान,  अल्पवयीन मुलाला पोलीस उपनिरिक्षक नम्रता राठोड, कपिल  मस्के, जमादार रमेश तायडे यांनी ताब्यात घेतले. या घटनेचा  पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक अस्मिता मनोहर करीत  आहेत.

Web Title: Five-year-old Chimukuli on the subject!