आणखी पाच पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:35+5:302021-09-05T04:47:35+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. गत दोन दिवसांपासून रुग्णसंख्या पाच, पाच अशी येत ...

Five more positives; A corona free! | आणखी पाच पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !

आणखी पाच पॉझिटिव्ह; एक कोरोनामुक्त !

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. गत दोन दिवसांपासून रुग्णसंख्या पाच, पाच अशी येत आहे. शनिवारीदेखील पाच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. वाशिम शहरात १, टनका १, कारंजा शहरातील प्रगती नगर व धनज येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. उर्वरित चार तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७२३ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.

००००

१७ सक्रिय रुग्ण

शनिवारच्या अहवालानुसार नवीन पाच रुग्ण आढळून आले तर एकाने कोरोनावर मात केली. सध्या गृहविलगीकरणात १७ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. गत दोन दिवसांत दहा रुग्ण आढळून आल्याने गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्याही वाढल्याचे दिसून येते.

0000000000000

चार तालुके निरंक

शनिवारच्या अहवालानुसार कारंजा व वाशिम तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले. उर्वरित मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

Web Title: Five more positives; A corona free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.