हुंबाड हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींना अटक!

By Admin | Updated: July 9, 2017 19:48 IST2017-07-09T19:48:15+5:302017-07-09T19:48:15+5:30

रिसोड (वाशिम) : तालुक्यातील ग्राम बिबखेडा येथील रहिवासी गजानन तुकाराम हुंबाड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. पाच आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

Five accused arrested in connection with the murder of Hubad! | हुंबाड हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींना अटक!

हुंबाड हत्याकांडप्रकरणी पाच आरोपींना अटक!

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : तालुक्यातील ग्राम बिबखेडा येथील रहिवासी गजानन तुकाराम हुंबाड यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ८ जुलै रोजी उघडकीस आलेल्या या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी ९ जुलैला पाच आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
मृतक गजानन हुंबाड (वय ४० वर्षे) यांच्या स्वत:च्या मालकीचे मालेगाव नाका येथील दुकान संदिप पवार नामक व्यक्तीला भाड्याने दिले होते. घटनेच्या दिवशी पवारने परमेश्वर खडसे या साथीदाराला सोबत घेत हुंबाड यांना एका स्त्रीचे आमीष दाखवून मोटारसायकलवर साखरा फाट्यावर नेले आणि तेथे चार जणांनी मिळून हुंबाड यांचा खात्मा केला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी संदिप भिकाजी पवार, परमेश्वर माधवराव खडसे, उमेश लक्ष्मण वानखडे (सर्व रा.शेलूखडसे) तसेच कट रचल्याप्रकरणी गजानन हुंबाड यांचा साळा ज्ञानेश्वर दिनकर हरकळ व  सासरा दिनकर नथ्थुजी हरकळ (रा.गोभणी) अशा पाच आरोपींवर कलम ३०२, २०१, ३४ , १२० ह्यबह्ण भादंविअन्वये गुन्हे दाखल करुन अटक केली आहे; तर या घटनेमधील सहावा आरोपी प्रकाश पंढरी खडसे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

 

Web Title: Five accused arrested in connection with the murder of Hubad!