उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस ‘निरंक’!

By Admin | Updated: October 25, 2016 02:13 IST2016-10-25T02:13:32+5:302016-10-25T02:13:32+5:30

वाशिम, मंगरूळपीर, कारंजातील तहसीलवर शुकशुकाट

First day to file nomination for 'Niranj'! | उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस ‘निरंक’!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस ‘निरंक’!

वाशिम, दि. २४- येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी तीनही नगर पालिका क्षेत्रात एकही अर्ज दाखल झाला नाही. तहसील कार्यालयाकडे इच्छुक उमेदवार फिरकलेच नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषदेचा पाच वर्षांंंचा कार्यकाळ डिसेंबर महिन्यात संपत असून, २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने युती अथवा आघाडीकडे लक्ष न देता स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे; तसेच २४ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला; मात्र पहिल्या दिवशी तीनही नगर परिषद क्षेत्रात एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली.
तथापि, २९ ऑक्टोबरपर्यंंंत दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपयर्ंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज ह्यऑनलाइनह्ण पद्धतीने भरणे आवश्यक असून, त्याची ह्यप्रिंटह्ण काढून ती स्वाक्षरीसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागणार आहे. अर्जाची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी २ नोव्हेंबर २0१६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Web Title: First day to file nomination for 'Niranj'!