शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी शासकीय कार्यालयांना आग

By admin | Updated: April 24, 2017 02:20 IST

कारंजा येथे वन विभाग, तर आसोला येथे शाळेचा समावेश : लाखोंचे नुकसान

वाशिम: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाला आग लागल्याची घटना रविवार, २३ एप्रिल रोजी घडली. कारंजा येथे वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले, तर आसोला येथे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला व लागूनच असलेल्या गोठ्याला आग लागली.कारंजा लाड : येथील मंगरुळवेश जवळील वन विभागाच्या कार्यालयाला आग लागून त्या आगीत वन विभागाच्या कार्यालयातील संगणकासह दस्ताऐवज जळून खाक झाले.रविवारी सुट्टी असल्याने कार्यालयात कोणीही हजर नसताना संगणकाच्या खोलीतून धूर येत असल्याचे महिला वन कर्मचाऱ्याचे पती शरद मोकरणे यांच्या लक्षात आले. त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तशी माहिती देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीमध्ये दोन संगणक संच, दोन स्कॅनर, एक कलर प्रिंटर, एक दूरध्वनी संच, दोन सिलिंग फॅन व फर्निचर जळून खाक झाले. कारंजा वन विभाग कार्यालयाच्या चार खोल्यात ही आग लागली. यामध्ये वन गुन्हे प्रकरणे, कॅशबुक, गुन्हे नोंदवही, आवक जावक रजिस्टर, वन्य प्राणी हल्ला नुकसान प्रकरणे, हरित सेना नोंदणी फॉर्म, असे दस्ताऐवजसुद्धा जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार संगणक खोलीतील शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या आगीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, वाशिम येथील अधिकारी आर.बी. गवई, यांनी घटनास्थळाला भेट दिली. या आगीसंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलीस, लाईनमन व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आग विझविण्याचे साहित्य उपलब्ध असूनदेखील आगीच्या रुद्रावतारामुळे त्या साहित्यापर्यंत पोहोचता आले नाही, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. डोंगरे यांनी दिली.मोप : रिसोड तालुक्यातील आसोला येथे जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला आग लागली व त्या शेजारील गोठासुद्धा जळून खाक झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातील जनावरांना बाहेर काढल्याने प्राणीहानी टळली.मारोतीच्या पाराजवळ जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत असून त्यालगत गावकऱ्यांचे गोठे आहेत. २३ एप्रिल रोजी अचानक आग लागली. गावकऱ्यांच्या सतर्कतेने गोठ्यातील जनावरांना सोडल्याने प्राणहानी टळली. आग गावात पसरु नये म्हणून उपाययोजना केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी गावात दाखल झाली व आग विझविण्यात आली. शाळेची इमारत व नारायण पाचरणे यांचा जनावरांचा गोठा जळून खाक झाला. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याची व्यवस्था व प्रयत्न केले.