विवाहितेचा छळप्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 28, 2016 23:59 IST2016-08-28T23:59:54+5:302016-08-28T23:59:54+5:30
मानोरा तालुक्यातील गिरोली येथील घटना.

विवाहितेचा छळप्रकरणी सात जणांविरुध्द गुन्हा दाखल
मानोरा(जि. वाशिम), दि. २८ : पोलिस स्टेशन मानोरा अंतर्गत येत असलेल्या गिरोली येथील विवाहिताा फिर्यादी रुकसाना परवीन शेख हकीम (२0) रा.गिरोली हल्ली मुक्काम कारंजा हिला तिच्या सासरच्या मंडळींनी पैशासाठी मानसीक व शारीरिक त्रास देवून मारहाण केली. अशा फियादीवरुन मानोरा पोलिसांनी सासरच्या ७ लोकांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
आरोपी शेख हकीम शेख अकील (पती) शेख अकील शेख हातम (सासरा), शकीलाबी शेख अकील (सासू), शेख सलीम शेख अकील (दिर), सर्व राहणार गिरोली तसेच नसरी परवीन शेख नसीम (ननंद) रा. दर्यापूर, यासीन परवीन शेख आसिफ (नंनद), अफरीन परवीन अ.आशिक (नंनद) यांनी फिर्यादी रुकसाना परवीन शेख हकीम हिला माहेरवरुन पैसे आण असा तगादा लावला व शारीरिक मानसीक त्रास देवून मारहाण करुन माहेरी आणुन घातले.अशा फिर्यादी वरुन मानोरा पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी कलम ४९८ (अ) ३२३ भादंवी अन्वये गुन्हे दाखल केले. या घटनेचा अधिक तपास मानोरा ठाणेदार मळघने यांचे मार्गदर्शनाखाली जमादार विजय जाधव करीत आहे.