अखेर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 04:29 PM2019-09-06T16:29:30+5:302019-09-06T16:29:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  वाशिम : जिल्ह्यात जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असताना वारंवार तारखेत बदल ...

Finally, the smart choice of district smart village started | अखेर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीचा मुहूर्त निघाला

अखेर जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीचा मुहूर्त निघाला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: जिल्ह्यात जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असताना वारंवार तारखेत बदल करूनही ही प्रक्रिया प्रलंबित राहत आहे. या संदर्भात लोकमतने २३ आॅगस्टच्या अंकात ‘जिल्हा स्मार्ट ग्राम निवडीसाठी मुहूर्त मिळेना!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याच दखल घेऊन आता तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी  ४ सप्टेंबर रोजी नव्याने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तीन ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन येत्या ११ सप्टेंबरला, तर उर्वरित ३ ग्रामपंचायतींचे १३ सप्टेंबरला करण्याचे ठरले आहे. 
वाशिम जिल्ह्यात २०१८-१९ अंतर्गत मानोरा तालुक्यातील गिरोली, कारंजा तालुक्यातील विळेगाव, मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा, वाशिम तालुक्यातील काटा, रिसोड तालुक्यातील बिबखेडा आणि मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा या ग्रामपंचायतींची तालुकास्मार्ट ग्राम म्हणून निवड झाली.  या ग्रामपंचायतींचे पुर्नमुल्यांकन करून जिल्हा स्मार्ट ग्राम निवडण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्मार्ट ग्राम तपासणी समिती अध्यक्षांनी जिल्हा तपासणी समितीच्या सदस्यांना सुचित केले. त्यात ३१ मे रोजी पूर्व नियोजित तपासणीची तारिख बदलून सहा ग्रामपंचायतींसाठी गिरोली आणि विळेगावसाठी १ जुन, सायखेडा, काटासाठी ४ जून, तर बिबखेडा आणि ढोरखेडासाठी ६ जून २०१९ ची तारिख निश्चित करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतींनी तयारीही केली; परंतु या तारखेत ७ आॅगस्ट रोजी बदल करून गिरोली, विळेगाव आणि सायखेडा ११ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी  १२ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. त्यापूर्वीच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा तारखेत बदल करून  गिरोली, विळेगाव आणि सायखेडा १३ आॅगस्ट, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी १४ आॅगस्ट तारीख निश्चित करण्यात आली. या तारखेलाही पुनर्मुल्यांकन करण्यात आले नाही. वारंवार तारखेत बदल होत असल्याने स्मार्ट ग्राम निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. या संदर्भात लोकमतने २३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत आता सहा तालुका स्मार्ट ग्रामपंचायतींपैकी गिरोली, विळेगाव आणि सायखेडा या तीन ग्रामपंचायतींसाठी ११ सप्टेंबर, तर काटा, बिबखेडा आणि ढोरखेडासाठी  १३ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आता या तारखेला स्मार्ट ग्रामपंचायतींचे पुनर्मुल्यांकन होते की, पुन्हा तारखेत बदल होतो, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Finally, the smart choice of district smart village started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम