मारहाणप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

By Admin | Updated: June 24, 2017 05:28 IST2017-06-24T05:28:04+5:302017-06-24T05:28:04+5:30

गोलवाडी येथे किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध २३ जून रोजी गुन्हा दाखल केला.

Filed in riot cases against each other | मारहाणप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

मारहाणप्रकरणी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: तालुक्यातील गोलवाडी येथे किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध २३ जून रोजी गुन्हा दाखल केला.
याबाबत गजानन आकाराम शिंदे (वय ४७ वर्षे, रा.गोलवाडी) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की आरोपी संजय उत्तम शिंदे हा महादेव टाले यांचा ट्रॅक्टर घेऊन माझ्या धुर्‍यावरून जात असताना कोर्टाचा निकाल लागेपर्यंंंंत धुर्‍यावर येऊ नको, असे म्हटले असता, त्याने डोक्यावर लोखंडी टामीने मारून जखमी केले व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संजय उत्तम शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी गजानन शिंदे यांच्याविरुद्ध कलम ३३७, ५0४, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Filed in riot cases against each other