पाचवीच्या विद्यार्थ्याला भर रस्त्यातच बसमधून उतरिवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:13+5:302021-02-13T04:40:13+5:30
आगार व्यवस्थापकांना दिलेल्या तक्रारीनुसार कामरगाव येथील जगदीश खंडारे यांचा मुलगा अथर्व हा कारंजा येथील ब्ल्युचिप काॅन्व्हेंटमध्ये इयत्ता पाचवीत शिकत ...

पाचवीच्या विद्यार्थ्याला भर रस्त्यातच बसमधून उतरिवले
आगार व्यवस्थापकांना दिलेल्या तक्रारीनुसार कामरगाव येथील जगदीश खंडारे यांचा मुलगा अथर्व हा कारंजा येथील ब्ल्युचिप काॅन्व्हेंटमध्ये इयत्ता पाचवीत शिकत असून, तो दररोज कामरगाव-कारंजा अशी येजा करतो. ९ फेब्रुवारीला तो नेहमीप्रमाणे शाळेत आला व कारंजाहून एमएच-४० वाय ५३०६ या क्रमांकाच्या बसने घरी जाण्यासाठी निघाला. कारंजा बसस्थानकापासून ३ किलोमीटर अंतरावर बस गेली असता, बसमधील वाहकाने तुझ्याकडे ओळखपत्र नाही, असे धमकावत एसटी बसमधून उतरवून दिले. त्या विद्यार्थ्याकडे पैसे नसल्याने त्याला पायी चालत कारंजा बसस्थानकात जावे लागले. त्या विद्यार्थ्याकडे ०२०९३६२११ क्रमांकाची पास असतानाही संबंधित वाहकाने त्याला उतरून दिल्याने त्या वाहकाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्याच्या पालकांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाय विद्यार्थी पायी कारंजा बसस्थानकात जात असताना त्याच्या जिवाचे काही बरेवाईट झाले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती, असा सवाल देखील तक्रारीत त्याच्या पालकांनी उपस्थित केला आहे.