शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारीसोबतच प्रतिस्पध्र्यांची मतं तोडण्यासाठी ‘फिल्डिंग’!

By admin | Updated: August 20, 2014 23:07 IST

निवडणुकीची दिनांक अद्याप घोषित झाली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

वाशिम : वाशिम-विधानसभा निवडणुकीची दिनांक अद्याप घोषित झाली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी एकीकडे 'फिल्डिंग' लावली असून, दुसरीकडे प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवारांचा अंदाज घेत त्यांच्या मतांचे विभाजन करण्याच्या दृष्टिकोणातून डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रमुख पक्षातील नेत्यांचे गत आठ दिवसांपासून भेटीगाठीचे सत्र सुरू आहे. वाशिम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील युती आणि आघाडीतील घटक पक्षांमधील इच्छूक उमेदवार अद्याप घोषित झाले नाहीतच त्यात सर्वच पक्ष मतदारसंघ आपल्या पक्षाकडे देण्यासंदर्भात आग्रही दिसून येत आहेत. त्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. त्यामुळे २00९ च्या निवडणुकीत होती तीच व्यवस्था कायम असल्याचे मान्य करून कार्यकर्ते आणि नेते कामाला लागले आहेत. त्या दृष्टिकोणातून अनेक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांच्या मुलाखतीचे कार्यक्रम आटोपले तर काहींचे आहेत. आता निवडणुकीच्या घोषणेसोबतच उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा सर्वच पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना आहे. त्यापूर्वी जिल्ह्यात इच्छुकांनी आपलेच तिकीट पक्के समजून मतदारसंघात काम करणे सुरू केले आहे. मतदारसंघातील प्रभावशाली कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भेटी घेऊन आपले तिकीट कसे पक्के झाले आहे आणि त्यासाठी तुमची मदत हवी असल्याचे साकडे घालणे सुरू आहे. या गाठीभेटीतूनच आपला प्रतिस्पर्धी कोण राहील, याचा अंदाज घेऊन त्याच्या मतांचे विभाजन करण्यासाठी कोणते डावपेच आखता येईल, याबाबत चर्चा सुरू आहे. वाशिम मंगरूळपीर मतदारसंघात वाशिम व मंगरूळपीर तालुका येत असल्याने या भागातील बलशाली नेत्यांना यासाठी कामाला लावले जात आहे. हाच प्रकार कारंजा व रिसोड विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्येही नेत्यांनी कार्यकर्ते शोधून त्यांना प्रतिस्पध्र्यांची मतं कमी करण्याच्या दृष्टिकोणातून कामाला कसे जुंपता येईल, याबाबत डावपेच आखणे सुरू केले आहे.