शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भंगारातील साहित्य घेऊन बनविले खत पेरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 1:29 PM

मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या समस्येवर मात करण्यासाठी इंझोरीचा युवा शेतकरी अजय ढोक याने चक्क खत पेरणी यंत्रच तयार केले आहे.

- नरेश आसावा लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: पिकांना खत देण्यासाठी दिवसेंदिवस खर्चात होणारी वाढ, मजुरांचा तुटवडा आणि कामाला होणारा विलंब या तिन्ही समस्येवर मात करण्यासाठी इंझोरीचा युवा शेतकरी अजय ढोक याने चक्क खत पेरणी यंत्रच तयार केले आहे. विशेष म्हणजे यासाठी सदर शेतकऱ्याने भंगारातील टाकाऊ साहित्याचाच वापर केला आहे.इंझोरी येथील युवा शेतकरी अजय ढोक हे आपल्या वडिलोपार्जित शेतीत विविध पिके घेऊन आर्थिक विकास साधण्याची धडपड करीत आहेत. त्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोगही केले आहेत. कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतीतील अधिकाधिक कामे कशी करता येतील, यासाठी ते सतत वेगवेगळे प्रयोग करतात. त्यातील काही प्रयोग यशस्वीही झाले आहेत. याच प्रयोगातून त्यांनी कमी वेळेत, कमी खर्चात आणि प्रभावीरित्या खताची पेरणी करावी म्हणून चक्क ट्रॅक्टरचलित खत पेरणी यंत्रच तयार केले आहे. यासाठी त्यांनी एक लोखंडी पेटी, दुंड्याची फ्रेम, मोठ्या पेरणी यंत्राचा गिअर आणि चेन व्हील सेट, असे विविध साहित्य भंगाराच्या दुकानातून खरेदी केले. हे सर्व साहित्य जोडून त्यांनी अवघ्या पाच हजार रुपयांत अतिशय उपयुक्त असे खत पेरणी यंत्र तयार केले. यासाठी त्यांना लक्ष्मणराव आखुळ यांचे सहकार्य लाभले. खत पेरणी यंत्राचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वत:च्या शेतात केले आणि ते प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. या पेरणी यंत्राच्या आधारे कपाशी, तूर, मुग, उडिद, सोयाबीन, पपई, कारले, दोडका आदि विविध पिकांत खत पेरणीही त्यांनी यशस्वीपणे करून दाखविली. इंझोरी येथील शेतकरी अजय ढोक यांनी वेगवेगळे प्रयोग करून कमी खर्चात भरघोस पिक घेण्याची कामगिरीही साधली आहे. कपाशी, तूर, सोयाबीन, मुंग, उडिद या खरीप पिकांसह भाजीपाला पिकांचेही ते अधूनमधून उत्पादन घेतात. यापुढे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तणाचा समुळ नायनाट करणे, फवारणीचे काम सोपे करण्यासाठीही यंत्र विकसीत करता येईल का, याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतरही शेतकºयांकडून वापरइंझोरी येथील प्रयोगशील शेतकरी अजय ढोक यांनी खत पेरणीसाठी तयार केलेले यंत्र स्वत:च्या शेतात खतपेरणीसाठी वापरले असून, याचा फायदा होत असल्याने इतरही शेतकरी त्यांच्याकडून या यंत्राचा वापर करीत आहेत. गावातील अनेक शेतकºयांनी या यंत्राच्या आधारे शेतातील आंतर पिकात खत टाकून घेतले आहे. त्यामुळे त्यांचा खर्च आणि वेळ वाचलाच आहे शिवाय मजुरांच्या तुटवड्याचा त्रासही टळला असून, पिके योग्य प्रमाणात मिळालेल्या खतामुळे जोमदार झाली आहेत. प्रामुख्याने कपाशीच्या पिकात याचा वापर होत आहे.

एकरी सहाशे रुपयांसह वेळेची बचतया यंत्रामुळे शेतकºयांना पिकांना खत देण्यासाठी येणाºया खर्चात एकरी ६०० रुपयांची बचत होतेच शिवाय कमी वेळेत प्रभावी पद्धतीने खत पिकांना देणे शक्य होत असल्याने पिकांना त्याचा मोठा फायदा होऊन पिके जोमदारही होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याशिवाय आंतरमशागतीच्या खर्चातही ६०० रुपयांची बचत या यंत्रामुळे होत आहे. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकºयांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी