तपासणीसाठी खत, बियाण्यांचे नमुने घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 17:43 IST2021-05-30T17:41:47+5:302021-05-30T17:43:52+5:30
Agriculture News : कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली.

तपासणीसाठी खत, बियाण्यांचे नमुने घेतले
href='https://www.lokmat.com/topics/washim/'>वाशिम : कृषी निविष्ठासंदर्भात शेतकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हास्तरीय भरारी पथकाने २९ मे रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग परिसरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. रासायनिक खते व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. दरम्यान, शासकीय दरानुसारच बियाणे, खतांची विक्री करण्याच्या सूचना कृषी सेवा केंद्र संचालकांना यावेळी देण्यात आल्या.केंद्र सरकारने अनुदानात वाढ केल्याने डीएपीसह अन्य कंपनीच्या काही खतांच्या किंमती कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारने जाहिर केलेल्या दरानुसार रासायनिक खतांची विक्री शेतकºयांना होत आहे की नाही याची पडताळणी म्हणून कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रमेश भद्रोड यांनी २९ मे रोजी अनसिंग येथे कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. जादा दराने खत विक्री करण्यात येऊ नये, रास्त दरात विक्री करण्यात यावे, पॉस मशीनद्वारेच खताची विक्री करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. कृषी सेवा केंद्रांची तपासणी दरम्यान रासायनिक खतांचे नमुने व बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक भद्रोड यांनी दिली. अहवाल प्राप्त होताच दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, विक्रेत्याने जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा कृषी विकास अधिकारी विकास बंडगर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिला.