एचआयव्ही, क्षयरोग्यांना सेवा देणाºया कर्मचाºयांचा सत्कार
By Admin | Updated: March 30, 2017 13:58 IST2017-03-30T13:58:35+5:302017-03-30T13:58:35+5:30
क्षयरोग्यांच्या सेवेत मोलाचे योगदान देणाºया कर्मचाºयांचा विहान प्रकल्प वाशिमच्यावतीने सत्कार करण्यात आला.

एचआयव्ही, क्षयरोग्यांना सेवा देणाºया कर्मचाºयांचा सत्कार
वाशिम: जागतिक क्षयरोग (टीबी) दिनाच्या औचित्यावर गुरुवार ३० मार्च रोजी एचआयव्ही आणि क्षयरोग्यांच्या सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विहान प्रकल्प वाशिमच्यावतीने सत्कार करण्यात आला.
एचआयव्ही एड्सबाधित रुग्ण आणि क्षयरोग्यांना समाजात आपुलकीची वागणूक मिळणे आवश्यक आहे; परंतु बव्हंशी तसे होत नाही. या रुग्णांकडे समाजातील लोक आपुलकीने नव्हे, तर मनात भिती ठेवून पाहत असतात. अशा रोग्यांना एड्स नियंत्रण कक्षाचे कर्मचारी चांगली वागणूक देऊन त्यांच्यात जगण्याचा विश्वास निर्माण करतात. अशा कर्मचाऱ्यांचा विहान प्रकल्प वाशिमच्यावतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एड्स नियंत्रण कक्षात प्रशस्ती पत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आयसीटीसी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, समुपदेशक पंढरी देवळे, एसटीडी समुपदेशक घुगे, एआरटी समुपदेशक अनिल राठोड, तसेच टीबी सेंंटरचे कर्मचारी भगत यांच्यासह वरिद या महिला कर्मचाऱ्याचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला विहान प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.