स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन १० महिन्यांपासून प्रलंबित
By Admin | Updated: April 24, 2017 20:54 IST2017-04-24T20:54:24+5:302017-04-24T20:54:24+5:30
वाशिम: शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या बचतगटांचे मानधन गेल्या ९ ते १० महिन्यापासून थकित आहे.

स्वयंपाकी व मदतनिसांचे मानधन १० महिन्यांपासून प्रलंबित
वाशिम: शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या बचतगटांचे मानधन गेल्या ९ ते १० महिन्यापासून थकित आहे. याबाबत आंदोलने, निवेदने देऊनही त्याची शासन, प्रशासनाने दखल न घेतल्याने पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या महिला आणि बचतगट हताश झाले आहेत.
जिल्ह्यातील पोषण आहार शिजविणाऱ्या कामगारांना मागील १० महिन्यांपासून त्यांचे मानधन मिळाले नाही. त्याशिवाय त्यांना भाजीपाला, इंधनाच्या खर्चाची रक्कमही अदा करण्यात आलेली नाही. पोषण आहार कामगार, बचतगटाच्यावतीने या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मानधन अदा करण्याची मागणी करण्यासह मानधन १० हजार रुपये देवून कायम सेवेत घ्यावे, महिला बचतगटामार्फत राशन दुकानामधील सर्व वस्तू गटामार्फत देण्यात यावे, शालेय पोषण आहार योजनेतंर्गत डाटा एंट्री आॅपरेटर यांना २० हजार रुपये मानधन द्यावे, कामावरून कमी केलेल्या स्वयंपाकी व मदतनिस यांना तत्काळ कामावर घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय परिसरात उपोषण, धरणे आंदोलनही करण्यात आले; परंतु अद्याप प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल नाही.