तिसऱ्या लाटेची भीती; रुग्ण आढळताच एक शाळा पुन्हा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:17+5:302021-07-31T04:41:17+5:30
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या ...

तिसऱ्या लाटेची भीती; रुग्ण आढळताच एक शाळा पुन्हा बंद!
शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांत असलेल्या २७५ शाळांपैकी ८१ शाळा शुक्रवार ३० जुलैपर्यंत जि.प. शिक्षण विभागाने सुरू केल्या. शाळा सुरू करण्यात आल्यानंतर गावात पुन्हा कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामपंचायतींनी आवश्यक खबरदारी घेतली आहेच शिवाय शाळांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यासह विद्यार्थ्यांची तपासणी, बैठक व्यवस्थेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. तथापि, एवढी काळजी घेतल्यानंतरही मानोरा तालुक्यातील शेंदुरजना आढाव येथे एक नवा कोरोनाबाधित आढळून आल्याने येथील शाळा शिक्षण विभागाला बंद करावी लागली.
----------------
१) जिल्ह्यात एकूण शाळा - २७५
सध्या सुरू असलेल्या शाळा - ८१
तालुका - सुरू असलेल्या शाळा - पुन्हा बंद केलेल्या शाळा
कारंजा - ३० - ००
मालेगाव - २२ - ००
मंगरुळ - ०७ - ००
मानोरा - ०५ - ०१
रिसोड - १२ - ००
वाशिम - १२ - ००
(तालुक्यांच्या संख्येनुसार यात बदल करावा)
२) कोणत्या वर्गात किती उपस्थिती?
वर्ग मुले - मुली - एकूण उपस्थितीचे प्रमाण (%)
आठवी - २५० - २०१ - ४५१ - ३.१२
नववी - २७० - २१० - ४८० - ४.०५
दहावी - ३०१ - १८८ - ४८९ - ७.१५
अकरावी -०० - ००० - ००० - ०००
बारावी - २७७ - १८७ - ४६४ - ७.९२
३) पंधरा दिवसात एक शाळा बंद
कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागांतील गावांत ग्रामपंचायतीने हमी घेतल्यानंतर आणि प्रस्ताव दिल्यानंतर शिक्षण विभागाकडून ८१ शाळा सुरू करण्यात आल्या. ही प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू करण्यात आली असून, ३० जुलैपर्यंत ८१ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, या पंधरा दिवसांत केवळ एका गावात नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एक शाळा बंद करावी लागली.
४) विद्यार्थी मजेत, पालक चिंतेत
कोट : शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेतही आवश्यक काळजी घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची फारसी भीती नसून, नियमित शाळेत जाणे आम्हाला आता आवडत आहे.
-संकेत गायकवाड,
विद्यार्थी
------
कोट : गेल्या दीड वर्षानंतर प्रथमच विद्यालय सुरू झाले. त्यामुळे मोठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसोबत विद्यालयात अभ्यास करण्याचा आनंद आता घेता येत असून, नेटवर्कअभावी अडथळे येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून सुटका झाली आहे. विद्यालयात आवश्यक काळजीही घेतली जात आहे.
- आदित्य इंगोले
----------
कोट : गेल्या दीड वर्षानंतर माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या. ही बाब चांगली आहे; परंतु कोरोना संसर्ग अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. शाळेत विद्यार्थ्यांची ंआवश्यक काळजी घेण्यात येत असली तरी बाहेरच्या व्यक्तींशी संपर्क वाढल्याने पाल्यास कोरोना संसर्ग होण्याची भीती असते.
- कैलास गायकवाड, पालक